जुगारा विरूध्द मंठा पोलीसांची सात जणांवर कारवाई
जुगारा विरूध्द मंठा पोलीसांची सात जणांवर कारवाई
मंठा प्रतिनिधी : मंठा पोलीस ठाण्याच्यावतिने शहरात सुरू असणार्या मटका व जुगार विरोधात माहितीच्या आधारे धाडी टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शनिवार [ता.१३] रोजी शहरातील कासार गल्लीत चोरून लपून जुगार खेळणार्या सात जणांवर कारवाई करून त्यापैकी पाच जणांना जेरबंद केले.दोन जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.मंठा पोलीसात सात जणांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२[अ] अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपींच्या मोटार सायकल व नगदी रूपये असा एकुण ७७ हजार ९१० रूपये चा मुद्देमाल पोलीसांकडुन जप्त करण्यात आला आहे.या कारवाई पोलीस निरीक्षक विलास निकम , फौजदार नितिन गट्टुवार , सहा.पो.उप. निरीक्षक भंडलकर, पोहेकाॅ.दिपक आढे, पोना.राठोड, इलग, आढे , राठोड यांचा पथकाने कारवाई केली.
जुगार व अवैद्य धंद्याबाबत नागरिकांनी पोलीसांना माहिती द्यावी, जेणेकरून पोलीसांना अवैद्य धंद्यावर कारवाई करता येईल.असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी केले आहे.
वाळु माफिया व अवैद्य धंदे करणार्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी हद्दपारीचे काही प्रस्ताव पोलीसांच्यावतिने पाठविण्यात आले आहेत.पोलीसांच्या कडक भुमिकेमुळे अवैद्य धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत.