जालना जिल्हा

घनसावंगी येथील बालाजी मंदिर जमिनीचा तो फेरफार रद्द करावा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी

images (60)
images (60)


जालना :


घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांत हिंदू मंदीराच्या जमिनी परस्पर नावे करण्यात आल्या असल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. तर अनेक गावांतील अश्या घटनांवर चौकशी देखील चालू आहे.


घनसावंगी तालुक्यातील अनेक गावातील देवस्थान जमिनी गावातील नागरिकांना भनक नसताना परस्पर नावावर करण्यात आल्या आहेत .सदर्भित प्रकरणात काही महसूल अधीकारी कर्मचाऱ्यांचा सबंध असल्याची बाब देखील समोर आली आहे.
यातच घनसावंगी शहरातील असलेल्या श्री श्री व्यंकटेश बालाजी देवस्थान ची कायदेशीर मालकी हक्काची जमीन जी चा क्रमांक ७६ असून क्षेत्रफळ ५ हेक्टर ५४आर असून संपूर्ण शेत जमीन ही चुकीच्या फेर लावून बेकायदेशीर मालकी हक्कात नोंद करण्यात आली आहे. संदर्भित फेर रद्द करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)शहराध्यक्ष राजेंद्र राजे जाधवराव देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी अंबड यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!