दिवाळी अंक २०२१महाराष्ट्र न्यूजसंपादकीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

images (60)
images (60)

      जालना दि.18 (न्यूज ब्युरो) :- महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करित असलेल्या समाज सेविका व संस्थाची दाद घ्यावी तसेच समाज सेविका व संस्थाना पुढे प्ररेणा मिळवी ,त्यांच्या समाजसेवेची प्रशंसा व्हावी जेणे करुण महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाज सेविका व संस्थानी पुढाकार घ्यावा , यासाठी महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करित असलेल्या समाज सेविका व संस्थांना राज्य शासना कडुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हा ,विभाग व राज्य स्तरावर देण्यात येतो .सन 2015-16,2016-17,2017-18,2018-19 व 2019-20 या वर्षासाठी सदर पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात 10 वर्ष पर्यंत किंवा 10 वर्षापेक्षा जास्त कार्य केलेले आहे.अशा महिला समाज  सेविका व संस्था यांच्या कडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यापुर्वी सावित्रीबाई फुले अथवा दलितमित्र पुरस्कार मिळालेला नसेल अशा महिला समाज सेविका सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करु शकतात .अर्जदार महिलेचे कार्य जात,धर्म, पंथ आणिे राजकीय पक्षाशी संबंधीत नसावे .तरी जालना जिल्हयातील पात्र समाज सेविका व संस्था यांनी आपले सन 1015-16, 2016-17, 2017-18, 2018-19, व 2019-20, या वर्षासाठी चे प्रस्ताव जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी विहित नमुन्यात खाली दिलेल्या ठिकाणी बातमी प्रसिध्द झाल्यापासुन सुटृीचा दिवस वगळता सात दिवसात तिन प्रतित सादर करावेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!