सोशल मीडियाने दिली साथ ,समाधानला मिळाली २ लाख 63 हजारचा मदतीचा हात
समाधान मोरे यांना उपचारासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातुन २ लाख ६३ हजार ५०० रु मदत
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील नांजा येथिल समाधान दादाराव मोरे वय ३४ यांना कर्करोग झाला असुन,त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार चालु आहेत पण घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना अर्थिक मदतीची गरज होती मोरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातुन तब्बल २ लाख ६३ हजार ५०० रुपयाची मदत झाली आहे.
तालुक्यातील नांजा येथिल समाधान मोरे हे गेल्या काही दिवसापासुन कर्करोगाच्या आजाराने ञस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारही चालु झाले पण मोरे यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने नांजा येथिल दर्शना ग्रुप व दिनेश पडोळ मिञ मंडळाच्या वतीने सोशल मिडियावर “आपली एक छोटी मदत वाचवु शकते कोणाचे तरी प्राण” ही पोस्ट व्हायरल करण्यात आली,आणि ही पोस्ट वाचुन मदतीचा ओग सुरु झाला,यामध्ये दर्शना ग्रुपच्या माध्यमातुन तब्बल २ लाख पन्नास हजाराची मदत झाली तर दिनेश पडोळ मिञमंडळातुन १३ हजार ५०० रुपय असे एकुण २ लाख ६३ हजार ५०० रुपयाची मदत समाधान मोरे यांना झाली आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातुन झालेल्या या मदतीमुळे आता समाधान मोरे यांच्यावर उपचार होणार असुन त्यांना पुढील उपचारासाठी आजुन अर्थिक मदतीची गरज आहे,मोरे यांच्यावर औरंगाबाद येथिल कृपामई हाॅस्पीटल येथे उपचार चालु असुन ज्यांना मदत करायची असेल त्यांना हाॅस्पीटल किंवा दर्शना ग्रुप नांजा यांच्याशी संपर्क करावा असे दर्शना ग्रुपच्या वतीने कळवण्यात आले आहे..