भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठों. येथे कोरोना जनजागृती
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन येथून जवळच असलेल्या जवखेडा ठों.येथे दि.२१ मार्च रोजी कोरोणा जन जागृती फेरी काढण्यात आली यावेळी सरपंच लक्षण ठोंबरे,केंद्र प्रमुख आर.पी.भाले,विठ्ठल घायाळ, ग्रामसेवक विठ्ठल नेवरे,उपसरपंच अशोक ठोंबरे,गंगाराम काळे,यांच्या नेतृत्वामध्ये कोरोना चे नियम पाळून कोरोना जनजागृती फेरी काढण्यात आली.
यावेळी सरपंच, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यानी गल्ली गल्लीत जाऊन मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, गर्दीत जाणे टाळा आदी प्रकारे मार्ग दर्शन केले.
यावेळी गावकरी,शिक्षक अंगणवाडी ताई यांच्या हातात जागृतीचे फलक होते
गर्दी टाळा-कोरोना पळवा, तोंडाला मास्क लावा, खोकतानां तोंडाला रुमाल लावा, सॅनिटायझर वापरा, नेहमी साबनाने हात धुवा अशी फलक घेऊन जन जागृती केली.
ही फेरी यशस्वी करण्यासाठी भारत दांडेकर, दयानंद घोरपडे,पांडुरंग मिसाळ, संजय शिंगणे,अशोक काशिद, सतिष पडघान,शिल्पा जाधव, हनुमान सानप,विष्णू ठोंबरे,शांताताई ठोंबरे, कांताताई राऊत, अनुमती ठोंबरे, सतिष ठोंबरे आदी उपस्थित होते.