नो पार्कींग २७ दुचाकीला आॅनलाईन पावत्या देवुन केला दंड,भोकरदन पोलिसांची कारवाई
मधुकर सहाने : भोकरदन
कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने शहरात गर्दी कमी करण्यासाठी करण्यासाठी नगरपालिका आणि पोलिस सर्वतोपरी पर्यंत करत असुन,आज नो पार्कींक उभ्या असलेल्या गर्दीच्या ठिकाणच्या २७ दुचाकींवर भोकरदन पोलिस स्टेशनच्या वतीने आॅनलाईन पावती देवुन दंड गर्दी टाळण्यासाठी सांगण्यात आले.
जालना जिल्हासह भोकरदन तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने नगरपालिका आणि पोलिस कर्मचारी नागरीकांना रोज मास्क वापरा,गर्दी टाळा,असे सांगत असुन नागरीक माञ याकडे दुलर्क्ष करतांनी दिसुन येत आहे,दि.२७ मार्च रोजी भोकरदन शहरातील छञपती शिवाजी पुतळ्याभोवती वर्दळीच्या ठिकाणी अनेकांनी दुचाकी नो पार्कींग लावल्याने व दुकानासमोर काहींना रोडलगत दुचाकी लावलेल्या २७ दुचाकींवर २०० आॅनलाईन पावतीप्रमाणे ५४०० रुपये दंड वसुल करण्यात आला.
या कारवाईमध्ये पोलिस काॅस्टेबल दिपक इंगळे,कर्मचारी संदिप गिरी,साबळे,जमील,थिटे,शेरु,अदिंनी ही कारवाई केली.