जालना क्राईम
शहरालगत शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांची धाड
11 जुगारी अटक रोख रक्कम, सहा मोटारसायकली, जुगाराच्या साहित्यासह 3 लाख 24 हजार 150 रु. मुद्देमाल जप्त
न्यूज ब्युरो – जालना शहरातील प्रकाश ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे एका शेतात तिरर्ट नावाचा जुगार खेळ सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून जुगार खेळतांना 11 जणांना रंगेहाथ पकडले.पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि. सावळे, नापोका. नंदलाल ठाकूर,साई पवार, पोकाँ. चंद्रकांत माळी, अनिल काळे, महिला कर्मचारी रेखा वाघमारे,चालक निकाळजे यांची कामगिरी.