भोकरदन तालुका

स्पार्किंगमुळे वालसा शिवात आग,दहा एक्करचा परिसरातील मक्का,ठिबक जळुन खाक

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे सोमवारी दि.२९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता लाईनच्या तारांचे घरसन होवुन लागलेल्या आगीत दहा एक्कर परिसरात पसरली यामध्ये जवळपास ४ ते ५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेली अधिक माहीती अशी की,भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथिल प्रल्लाद कौतीकराव बदर गट क्रमांक ७५ मध्ये विद्युत तारांचे घरसन होवुन आग लागली,ही बाब बाजुच्या शेतात खेळत असलेल्या सोपान खिल्लारे वय १५ याच्या लक्षात आल्यानंतर त्याने आग लागली ,आग लागली असा आरडाओरडा सुरु केला,आवाज ऐकुण आसपासचे शेतकरी आमोल जाधव,अभिषेक बदर,पांडुरंग जाधव,मारोती बदर,सतिष दाभाडे,आण्णा बदर,संदिप बदर,तुलसिराम खिल्लारे,सुनिल बुजड,या ठिकाणी आग विझवण्यासाठी ओले पोते, काड्या ,ओल्या झाडांच्या फांद्या आणुन आग विझण्याचा पर्यंत केला पण आग येवढी भयानक होती की,आग आटोक्यात येईपर्यंत प्रल्लाद कौतीकराव बदर यांची शंभर कुंट्ल मक्याचा पुंज व ४ एक्करचे ठिबक व जवळपासचे १० मक्याचे गुडही या आगीत जळुन खाक झाले.

या आगीत जवळपास ४ ते ५ लाखाचे शेतकर्यांचे नुकसान झाले असुन या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करुन महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे.

शंभर किव्टल मक्याची पुंजी डोळ्यासमोर जळतांनी पाहुन शेतकरी प्रल्लाद बदर हे अक्षरशा हातास होवुन फाशी घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

शेतकरी हताश

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!