जालना जिल्हा

पिर पिंपळगाव शिवारातील शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

जालना न्यूज ब्युरो

जालना तालुक्यातील पिर पिंपळगाव येथे शेत तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली

ह्याच तलावात दोन तरुणांचा मृत्यू झाला

पिर पिंपळगाव येथील रवी प्रल्हाद कावळे यांच्या शेतात पीर पिंपळगाव शिवार शेततळ्यात गजानन रामलाल जोरले (वय 32 वर्ष राहणार कुंभार गल्ली पाणीवेस) व कैलास आसाराम खरात (वय 30 वर्ष राहणार सोनल नगर जुना जालना) हे दोघे मित्र पोहण्यासाठी गेले होते.पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाली असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढले आहेत.याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तरुणांचे मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Open chat