जळगाव सपकाळची मातोश्री भागुबाई देवीची याञा रद्द
जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे दरवर्षी होळी झाल्यावर पाच दिवसांनी होणारी मातोश्री भागुबाई देवीची याञा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात अाल्याची बैठक सोमवारी गावामध्ये घेण्यात अाली.
जळगाव सपकाळ येथील ग्रामदेवत मातोश्री भागुबाई देवीची याञा दरवर्षी मोठया उत्साहात साजरी करण्यात येते तसेच अनेक देव देवतांची सोंगे व देवीची स्वारी काढण्यात येती व याञेला मराठवाडयासह विर्दभ,खान्देश यासह परिसरातील भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात माञ यावर्षी कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे गावातील ग्रामपंचायत,भागुबाई संस्थान,ग्रामस्थ अाणी याञेचे मानकरी ,पुजारी यांनी सोमवारी सकाळी अाठ वाजता बैठक घेवुन याञेविषयी चर्चा करण्यात अाली परंतु वाढत्या कोरानाच्या प्रभावामुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या अादेशामुळे गावातील ग्रामस्थांच्या एकमताने यावर्षी दि.१ एप्रिल रोजी गुरुवारी भरणारी याञा भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात अाला तसेच गावातील नागरिकांनी अाप अापल्या नातेवाईकांना कळवणे की यावर्षी याञा भरणार नाही त्यामुळे कोणीही याञेला येवु नये तसेच मंदिरात दर्शन सुध्दा बंद राहणार असल्याचे कळविण्यात अाले यावेळी गावातील गणपतराव सपकाळ,मधुकर सपकाळ,रमेश सपकाळ,डाॅ.शालीकराम सपकाळ,हेमंत सपकाळ,बंकु सपकाळ,सुभाष सपकाळ,पुजारी विजय सोनवणे,पुरुषोत्तम बिडवई,अरुण जोशी,राजु जोशी,सचिन देव तसेच गावातील पञकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.