लॉकडाऊन काळापासून महावितरण कंपनीची मनमानी थांबविण्याची मागणी
भोकरदन : मधुकर सहाने
लॉकडाऊन काळापासून महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देऊन शॉक दिला व या जास्तीच्या बिलामुळे व मानसिक मनमानी कारभारमुळे जनसामान्यांच्या माथ्यावर भरमसाठ बिल लादले गेले आहे. कित्तेक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे पण त्यांना विजबिल प्रमाणापेक्षा ही जास्त येत आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत आहे.
मागील वर्षी कडक लॉकडाऊन होते आणि त्यातून कुठे आता जनता सावरत आहे तर पुन्हा कडक निर्बंध घातले आहे.आणि त्यातच महावितरण कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे तसेच शेतकऱ्यांनाही अवाजवी बिले आकारणी केली आहेत रात्री-अपरात्री कधीही महावितरणच्या कर्मचारी शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करीत आहेत तसेच सवकारी पद्धतीने वीजबिल वसुली करत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हे जास्तीचे बिल भरण्यास असमर्थ असल्यामुळे लॉकडाऊन पूर्वी जितकी बिल होती तितकी द्यावी व सावकारी पद्धतीच्या वसुली थांबवावी .जनता हवालदिल होऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे तरी यावर आपण शासनाचा दुवा म्हणून शासनाकडे आमची मागणी मांडून लवकरच निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांना न्याय द्यावा आणि महावितरणच्या मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात आमच्या समिती मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कंपनीच्या विरोधात व्यापक आंदोलन करण्यात येईल असे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती भोकरदन तहसीलदारांना निवेदनात म्हटले आहे.तालुका अध्यक्ष. भोकरदन सद्दाम बेग मिर्झा, उपाध्यक्ष जुनेद खान पठाण,सचिव नासिर शेख धावडा, रावसाहेब सहाने, सहसचिव. राजू ठोंबरे राजुर उपाध्यक्ष, कासीमबेग मिर्झा प्रवक्ता भोकरदन. आदी उपस्थित होते.