बदनापूर नगर पंचायतीने लावलेला कर अन्यायकारक ,कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करा:- माजी आमदार संतोष सांबरे
जालना / प्रतिनिधी
बदनापूर नगर पंचायतीने नवीन कर प्रणाली प्रस्तावित केली असून ही कर प्रणाली प्रस्तावित करण्यासाठी केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणात मोठ्या चुका झालेल्या असल्याने शहरातील मालमत्ता धारकांना वाढीव कर आकारला गेला आहे, याबाबत माजी आमदार संतोष सांबरे यांनी नगर पंचायत बदनापूर कार्यालयास निवेदन सादर केले असून पंचायतीने लावलेला कर अन्यायकारक असून लवकरात लवकर कर संपूर्ण कर आकारणीचे पुनःसर्वेक्षणकरून कर प्रणाली दुरुस्ती करावी, अन्यथा नगर पंचायतीस टाळे ठोकू असा इशाराही माजी आमदार सांबरे यांनी दिला आहे,
यावेळी माजी आमदार सांबरे म्हणाले की, सध्या नगर पंचायतीच्या वतीने नवीन कर प्रस्तावित करून कलम 199 अनव्ये नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात घराचे क्षेत्रफळ वाढवून दाखवणे, व्यावसायिक जागा भाडेतत्त्वावर दिल्याचे नमूद करणे, सहान फ्लॅट असतांना बांधकाम दाखवणे अशा अनेक तक्रारी आहेत. त्याचबरोबर बदनापूर शहरात प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषदेकडे असून सर्व कारभार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे असून नगर पंचायतीची एकही शाळा नाही तरीही शैक्षणिक कर लावण्यात आला आहे, बदनापूर शहरातील आरोग्य सेवा सुद्धा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सांभाळतो, नगर पंचायतीचा शहरात कुठलाही दवाखाना नसताना देखील आरोग्य कर लावण्यात आला आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व बाबतीत कर आकारणी बाबत पुनः सर्वेक्षण करून आक्षेप नोंदविण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात यावी नसता नगर पंचायत कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करू असा इशाराही माजी आमदार सांबरे यांनी दिला.
यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासमवेत नगरसेवक सय्यद इम्रान, मा नगरसेवक फेरोज खान पठाण, राजू जऱ्हाड, राहुल जऱ्हाड, शिवाजी कऱ्हाळे, सुनील बनकर, शेख युनूस हुसेन, शेख रियाज सरदार, शेख मुजीब मतीन, रवी वाहुळे, नइम शेख, जावेद बागवान, संजय जऱ्हाड, शेख तारेख, सुधाकर खैरे, योगेश फटाळे, इलिया कांबळे, अंबादास काटकर, सय्यद दिलकश आलम, बबन महादू आतकरे आदींची उपस्थिती होती.