जालना जिल्हा

आधुनिक लहुजी सेनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश; विविध पदांवर  नियुक्ती



जालना,दि.२१(प्रतिनिधी)- आधुनिक लहुजी सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला
गती देण्यासाठी मातंग समाजातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी
२१ नोव्हेंबर रोजी जालना येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेत जाहीर प्रवेश
केला. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून
संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
जालना येथे हा प्रवेश व नियुक्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे नेतृत्व
आधुनिक लहुजी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रविकांत जगधने, राज्य
समन्वयक अंकुश यंगड, मराठवाडा संघटक कैलाश जाधव आणि जालना जिल्हाध्यक्ष
रामभाऊ सुतार यांनी केले. या कार्यक्रमात मीराताई सगट यांची आधुनिक लहुजी
सेनेच्या जालना महिला जिल्हाध्यक्षपदी, तर बालाजी पांडव यांची जिल्हा
संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय बंडू निकाळजे,सचिन लोंढे आणि
राजेश कांबळे यांनी संघटनेत जाहीर प्रवेश करून सामाजिक व संघटनात्मक
कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रामभाऊ सुतार म्हणाले की, आधुनिक
लहुजी सेनेची जालना जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी करण्यात येणार
आहे.शहरातील प्रत्येक प्रभागात संघटनेच्या शाखा स्थापन करून शाखा
उद्घाटनाचे कार्यक्रम राबविण्यात येतील. वंचित, उपेक्षित आणि शोषित
समाजघटकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने
संघर्ष करेल. जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात संघटनेचा विस्तार करून
सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यात येईल.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, मनोहर सगट, विकास कसबे
(तालुकाप्रमुख, जालना), सुनील हंगारगे, गणेश जाधव (उपाध्यक्ष, जालना)
यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन
पदाधिकार्‍यांच्या नियुत्तäया आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे
आधुनिक लहुजी सेनेच्या जालना जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा
मिळणार असून आगामी काळात संघटना अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी
व्यक्त करण्यात आला.

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना
NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,412
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

आधुनिक लहुजी सेनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश; विविध पदांवर  नियुक्ती

जालना,दि.२१(प्रतिनिधी)- आधुनिक लहुजी सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला
गती देण्यासाठी मातंग समाजातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी
२१ नोव्हेंबर रोजी जालना येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेत जाहीर प्रवेश
केला. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून
संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
जालना येथे हा प्रवेश व नियुक्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे नेतृत्व
आधुनिक लहुजी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रविकांत जगधने, राज्य
समन्वयक अंकुश यंगड, मराठवाडा संघटक कैलाश जाधव आणि जालना जिल्हाध्यक्ष
रामभाऊ सुतार यांनी केले. या कार्यक्रमात मीराताई सगट यांची आधुनिक लहुजी
सेनेच्या जालना महिला जिल्हाध्यक्षपदी, तर बालाजी पांडव यांची जिल्हा
संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय बंडू निकाळजे,सचिन लोंढे आणि
राजेश कांबळे यांनी संघटनेत जाहीर प्रवेश करून सामाजिक व संघटनात्मक
कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रामभाऊ सुतार म्हणाले की, आधुनिक
लहुजी सेनेची जालना जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी करण्यात येणार
आहे.शहरातील प्रत्येक प्रभागात संघटनेच्या शाखा स्थापन करून शाखा
उद्घाटनाचे कार्यक्रम राबविण्यात येतील. वंचित, उपेक्षित आणि शोषित
समाजघटकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने
संघर्ष करेल. जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात संघटनेचा विस्तार करून
सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यात येईल.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, मनोहर सगट, विकास कसबे
(तालुकाप्रमुख, जालना), सुनील हंगारगे, गणेश जाधव (उपाध्यक्ष, जालना)
यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन
पदाधिकार्‍यांच्या नियुत्तäया आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे
आधुनिक लहुजी सेनेच्या जालना जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा
मिळणार असून आगामी काळात संघटना अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी
व्यक्त करण्यात आला.

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!