घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगावात नालीचे घाण पाणी रस्त्यावर
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या समोरील पहिल्या गल्लीत असा नालीच्या पाण्यासह घाण रस्त्यावर आल्याने
या रस्त्यावरन चालणे ही जिकरीचे झाले आहे याच रस्त्यावरून अनेक जण ये जा करत आहे अनेक गल्लीसाठी हा रस्ता असल्याने रहदारी चा आहे यासाठी या भागांतील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कडे रस्ताबाबत विचारणा केली परंतु काहीही उपयोग झालेला नाही.या रस्त्याचे नूतनीकरण करून अडरग्राउड नाल्या करण्याची मागणी होत आहे तत्पूर्वी ग्रामपंचायतने नाल्या काढण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे