तळेगाव परिसरात दुचाकीचा भीषण अपघात; तीर्थपुरी येथील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
NEWS JALNA
घनसावंगी-जालना महामार्गावर अपघात; गौरव राऊत याच्या दुर्दैवी मृत्यूने तीर्थपुरी परिसरात हळहळ
तीर्थपुरी : घनसावंगी-जालना महामार्गावर तळेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीर्थपुरी येथील २४ वर्षीय तरुण गौरव साळीकराम राऊत (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गौरव हा दुचाकीवरून प्रवास करत असताना तळेगाव परिसरात अपघात घडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गौरव राऊत हा फायनान्स क्षेत्रात कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. गौरव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे तीर्थपुरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
न्यूज जालना YouTube व्हिडिओ
न्यूज जालना Facebook पेज

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.