परतूर लायन्स क्लब च्या पुढाकाराने लसीकरण मोहिमेला गती
परतूर : प्रतिनिधी
लायन्स क्लब परतुर आणि ग्रामीण रुग्णालय परतुर यांच्या संयुक्त सहकार्याने लायन्स क्लब ऑफिस येथे दिनांक 9 एप्रिल व 10 एप्रिल रोजी कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये दिनांक 9 रोजी 116 व्यक्तींना व दिनांक 10 रोजी 175 व्यक्तींना ही लस देण्यात आली. सध्याच्या करोना आजाराचा च्या महामारी च्या काळामध्ये ही लस म्हणजे एक संजीवनी आहे. उपजिल्हाधिकारी श्री जाधव साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले .
हे शिबिर संपन्न संपन्न करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय परतुर चे अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर नवल, डॉक्टर महादेव उनवणे तसेच तेथील कर्मचारी प्रवीण बारटक्के, यशोदा गवळी, तसलीम पठाण , कल्पना डांगे व मोनिका केशर खाने यांनी सहकार्य केले .
लायन्स क्लबचे सदस्य मनोहरराव खालापूरे, संजीवनीताई खालापूरे, अमित खालापूरे , प्रशांत राखे ,डॉक्टर भक्ती नंद ,डॉक्टर दत्तात्रय नंद ,डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर भानुदास कदम, सुनिल कासट , भारतीताई कासट, संदिप बाहेकर , बबनराव उन्मुखे ताराताई उन्मुखे , पुरुषोतम राठी , विश्वंभर बहिवाळ, गणेश सोळंके, महेश होलाणी, शिल्पाताई होलाणी , संदीप जगताप, प्रकाश च०हाण, कैलाश जगताप , राहुल सातोनकर , पार्थ राखे ,सुमित खालापूरे , प्रमोद टेकाळे , पियुष टेकाळे , शगुण होलाणी, प्रदिप मुजमुले व लायन्स क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.