मराठावाडामहाराष्ट्र न्यूज

साष्टपिंपळगावातील मराठा समाजाचे आमरण उपोषणाला पुन्हा सुरवात

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी बोलावून केली मराठा समाजाची फसवणूक : आंदोलकांचा आरोप

मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या कुटुंबियांचा हि स्थगित केलेल्या आमरण उपोषणात सहभाग.

जालना न्यूज दि ११ एप्रिल

images (60)
images (60)

राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगावच्या शिष्टमंडळात आणि मुख्यमंत्री यांच्यात पंधरा दिवसापुर्वी वर्षा निवासस्थानी मराठा समाजाच्या मुख्य मागण्या संदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्री सांगितले की, मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या कुटुंबाचे एकमत करा मी त्यांना शासकीय नोकरी देण्याचे तातडीने दोन दिवसात सुचना देवून आँर्डर करतो परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरीही मराठा समाजाच्या कोणत्याच मागणीची दखल सरकारने घेतली नाही म्हणून शनिवारपासून सकाळी १० वाजल्यापासून स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे

वर्षा निवासस्थानी झालेल्या मिटींगमध्ये अनेक मागण्यावर
सरकारने आश्वासन दिले होते त्यातील काही मागण्याची पूर्तता पंधरा दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु त्या मागण्या अद्यापही प्रलंबीत असल्याने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने स्थगित केलेले आंदोलनला सुरवात करण्यात आली आहे

खालील मागण्या केल्या होत्या

१)मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे.
२) मराठा आरक्षणासाठी शहिद झालेल्या कुटुंबियांला शासकीय नोकरीत घेण्यात यावे.
३) कोपर्डी खटला सुरू करण्यात यावा आणि जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी.
४) सारथी संस्था सुरू करण्यात यावी आणि संस्थेला जागा आणि संस्थेचा कर्मचारी स्टाफ भरण्यात यावा.
५) कोपरा ता.जि. लातूर येथील अत्याचारग्रस्त तरूणीवरील अँटाँसिटी अँक्ट रद्द करून, त्या नराधम आरोपींना अटक करण्यात यावी.
६) कै. आण्णासाहेब पाटिल विकास महामंडळाला अध्यक्ष नियुक्त करण्यात यावा.
७) कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फिस घेतलेल्या होत्या त्या परत करण्यात याव्यात.
८) आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात.
९) विजय वडेट्टीवार यांच्यामुळे जो मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे म्हणून त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश करावेत.
या विषयावर वर्षा निवासस्थानी महत्वाची सविस्तर चर्चा झाली होती, यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे समक्ष हजर होते आणि साष्टपिंपळगावचे शिष्टमंडळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचन दिले होते की, मी आपल्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करत आहे, येत्या दोन दिवसात मी रितसर आपणास लेखीपत्र पाठवतो आहे.

परंतु सरकारने कोणतीही दखल घेतली नाही आणि मराठा समाजाच्या मागण्या विषयी मुख्यमंत्री यांनी समाजाची फसवणूक केली आहे म्हणून आम्ही शनिवार पासून परत राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगाव याठिकाणी आमरण उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे
यामध्ये मराठा आरक्षणासाठी शहिद झालेले ४२ बांधवांच्या वतीने एक शिष्टमंडळ आमरण उपोषणाला बसले आहे, त्यामध्ये आण्णा शिवाजी काटे, पिंपळनेर, माणिक गोपीनाथ कदम, पाटेगाव हे कुटुबिय बसले आहेत आणि साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाच्या वतीने मनोज जरांगे पाटिल,मुक्ताबाई ढेपे, रावसाहेब सुळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

यावेळी बोलताना बलिदान देणार्‍या कुटुंबियांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, सरकारने आमच्या मागण्या ३ वर्ष का निकाली काढल्या नाहीत जर सरकारने मागेच शासकीय नोकरी दिल्या असत्या तर आमच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळच आली नसती अशी संतापजनक प्रतिक्रिया शहिद मुलाचे वडील माणिक कदम दिली आहे आणि शहिद वडिलांचा मुलगा आण्णा काटे यांनी दिली आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण मंजूर केल्या जात नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण आता मागे घेतले जाणारच नाही असा गंभीर इशाराच मनोज जरांगे पाटिल यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!