भोकरदन तालुका
भोकरदन तालुक्यातीत ब्रेक द चेन चा ग्रामिण भागात फज्जा.
भोकरदन तालुक्यातीत ब्रेक द चेन चा ग्रामिण भागात फज्जा,सर्वच व्यवहार चालु,माञ पोलिस ठाण्याच्या हादीत कडक बंदोबस्त
मधुकर सहाने : भोकरदन
राज्यभरात कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता माननिय मुख्खमंञी यांची ब्रेक द चेन १५ दिवसाचा लाॅकडाउन जाहीर केला असुन या लाॅकडाउनचा भोकरदन तालुक्यातील ग्रामिण भागात माञ फज्जा उडतांनी दिसुन येत आहे.
भोकरदन शहरातील मेडीकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने पुर्ण पणे बंद करण्यात आले असले तरी राजुर,केदारखेडा,सिपोरा,मव्हारा,तसेच सर्व ग्रामिण भागातील मोठमोठ्या गावातील वर्दळीच्या गावात माञ सर्वच दुकाने चालु असल्याची चिञ सध्या भोकरदन तालुक्यात पाहावयास मिळत आहे.नियम फक्त शहरासाठीच आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत असुन शहरात कोरोना पसरतो आणि ग्रामिण भागात पसरत नाही का असाही प्रश्न व्यापारी वर्गातुन होत आहे.सर्वांनी नियम पाळुन कोरोना या आजाराला हरवावे अशी मागणी भोकरदन तालुक्यातील व्यापारी वर्गातुन होत आहे.