देश विदेश न्यूजमहाराष्ट्र न्यूज

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण : केंद्र सरकारचा मोठा निर्णय

न्यूज जालना दि.19

images (60)
images (60)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1 मे पासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

संपुर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वी केंद्र सरकारनं 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात केली होती तर त्यापुर्वी कोरोना योध्दांना लस देण्यात येत होती. देशात वाढणार्‍या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लसीकरण मोहिम वेगानं राबविण्याचे ठरविले असून लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!