दिवाळी अंक २०२१भोकरदन तालुका

वादळाने नजर धूसर झाली ; बाईकची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू

भोकरदन /मधुकर सहाने: तालुक्यातील सोयगाव देवी फाटा ते गारखेडा या रस्त्यावर मंगळवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला . यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ वर्षांची एक मुलगी गंभीर जखमी आहे . विशाल कैलास साबळे ( 20 , रा बरंजळा ता . भोकरदन ) आणि विशाल शिवाजी दळवी ( 20 , रा . येवता ता जाफराबाद ) अशी मृतांची नावे आहेत . तर वैष्णवी दगडुबा साबळे ( ११ ) ही गंभीर जखमी असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत . अधिक माहिती अशी की , विशाल कैलास साबळे आणि वैष्णवी दगडुबा साबळे हे दोघे गारखेडाहून बरंजळा गावाकडे दुचाकीवरुन जात होते . तर विशाल शिवाजी दळवी हा सोयगाव देवी फाट्याकडून औरंगाबादकडे बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होता . सोयगाव देवी फाटा ते गारखेडा दरम्यान अचानक वादळ आल्याने दोघांचेही नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरासमोर धडकल्या . या भीषण अपघातात विशाल साबळे आणि विशाल दळवी जागीच ठार झाले . तर वैष्णवी साबळे ही गंभीर जखमी झाली आहे . तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत . अपघाताची माहिती मिळताच माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ . चंद्रकांत साबळे यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमी मुलीची भेट घेतली . तसेच भोकरदन पोलीस सुद्धा रुग्णालयात दाखल झाले आहेत .

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!