अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोना संकटकाळात हनुमान जयंती
आश्रमावरूनच युट्यूब लाईव्ह करून हनुमान कथेच्या माध्यमातुन साजरी ....
मधुकर सहाने : भोकरदन
आज रोजी संपूर्ण विश्व कोरोनासारख्या महामारीला सामोरे जात आहे अश्यातच कोरोनाशी लढा देत असताना प्रत्येक जण उद्विग्न व उदासीन झालेले आपल्याला दिसत आहे आणि त्यातच प्रार्थनास्थळे व मंदिर बंद असल्याकारणाने आता कथा आणि कीर्तनाचे सूर ऐकायला प्रत्येक भक्ताचे कान आसुसलेले आहे कारण एकमेव मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्याचे माध्यम म्हणजेच भगवंताचे कथा व कीर्तन अश्यातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा राष्ट्रीय कथा प्रवक्ते ह भ प श्री संतोषजी महाराज आढावणे पाटील यांनी आपल्या अधिकृत युट्युब वाहिनीवरून थेट कथा प्रक्षेपण करून भक्तांसाठी एक अनमोल संधीच उपलब्ध करून दिलेली आहे कारण कोणाच्याही संपर्कात न जाता आपण घरबसल्या आपण महाराजांच्या कथा व प्रवचनाचा आपण लाभ घेऊ शकतो आज महारुद्र हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान जयंती कथा व उत्सव साजरा करण्यात आला
महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांनी या संगीतमय कथेचा घरबसल्या आनंद घेतला
ऐकुणच कोरोनाच्या या संकटकाळात आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करून आढावणे माऊलींनी हनुमान जयंतीचा आनंद श्रोत्यांना मिळवुन दिला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.