भोकरदन तालुक्यातील भिवपूरगाव दीड वर्षापासून अंधारात,महावितरणचे दुर्लक्ष
अखेर गावकर्यांनी दिला अंदोलनाचा इशारा.
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील भिवपूर गाव गेल्या १९ महिण्यापासुन अंधाराचा सामना करत असुन,याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
१९ महिण्यापासुन भिवपूर गाव अंधारात असुन अनेक वेळा गावातील युवकांनी महावितरणच्या अधिकार्यांना वारंवार तक्रार करुनही या कडे कोणी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी दि.२९ एप्रिल रोजी समस्त भिवपूर ग्रामस्थांच्या वतीने महावितरणला निवेदन देवुन गावातील विजपुरवठा सुरळीत न झाल्यास अंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,गेल्या १९ महिन्यापासून भिवपूर गाव अंधारात आहे. प्रशासन देखील पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.मात्र महावितरण कंपनी ला गावकऱ्यांनी निर्वाणीचा इशारा देत लाईट सुरळीत करण्यासाठी विनंती वजा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसाचा वेळ ग्रामस्थ भिवपूर त्या वतीने महावितरण देण्यात आले आहे, अन्यथा कोरोना मूळे ठरवून दिलेल्या शासकीय नियमानुसार उपोषणाला बसणार आहोत असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेली १९ महिन्यापासून भिवपूर गाव हे अंधरात आहे,वारंवार महावितरण मधील सबंधित अधिकार्यांना तोंडी विनंती करून ते हा विषय गांभीर्याने घेत नव्हते.
वर्तमान स्थिती ही कोरोना महामारीने ग्रासलेली आहे.एकीकडे शासन Stay Home Stay safe म्हणून घरामध्ये थांबायला सागंत आहे. मात्र गावात लाईट नसल्याने घरात ही थाबता येत नाही आणी कोरोना मूळे बाहेर देखील पडता येत नाही आशी अवस्था गावकर्यांची झाली आहे.दोन दिवसात लाईट सुरळीत चालू झाली तर ठीक अन्यथा आम्ही कोरोना मूळे घालून दिलेल्या शासकीय नियमानुसार उपोषणाला बसणार आहोत.