कोरोना अपडेटभोकरदन तालुका

आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळेना

राज्य संघटनेचे राज्य संघटक मयूर थारेवाल यांचा आरोप

कोरोना योद्ध्यांना विमा नाकरणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध

images (60)
images (60)

भोकरदन : प्रतिनिधी

राज्यामध्ये महामारी ने सर्वत्र थैमान घातले आहे आणि या संकटा विरुद्ध राज्यातील 22500 कंत्राटी कर्मचारी दिवस-रात्र एक करून खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आरोग्य विभागातील कुठल्याही संस्थेमध्ये जा त्याठिकाणी जवळपास 90 टक्के कर्मचारी हे कंत्राटी असून आपल्या जिवाची पर्वा न करता तसेच आपल्या कुटुंबाच काय होईल याच विचार न करता अहोरात्र सेवा देत आहे आणि रुग्णांना सेवा देत असताना कर्मचारीसुद्धा या आजाराच्या तडाख्यात सापडत आहे हे असेच सुरू असताना राज्यातील भरपूर कर्मचारी हे मृत्युमुखी पडले आणि यांना विमा देण्यास हे अधिकारी अपयशी ठरले त्याला कारण असे आहे की अकोला जिल्ह्यातील स्वर्गीय ज्ञानेश्वर वाकोडे यांचे कोरोनाने निधन झाले ते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना येथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होते पण त्यांच्या निधनानंतर विम्याची फाईल प्रस्तावित करण्यात आली सदरील फाईल या अधिकाऱ्यांनी नाकारली त्याला कारण असे दिले की तुम्ही रुग्णांना प्रत्यक्ष सेवा देत नव्हते त्यामुळे तुम्ही ह्या विम्यात पात्र नाही असे लेखी स्वरूपाची पत्र दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी असून जे कर्मचारी रुग्णांना प्रत्यक्ष सेवा देतात त्यांचेही मृत्यू झाले आहेत त्याचच नवीन उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत स्वर्गीय अमित ढाणे हे रुग्णांना प्रत्यक्ष सेवा देत होते आणि यांचे सुद्धा कोरोना महामारी मुळेच निधन झाले परंतु त्यांच्या विम्याच्या बाबतीत कुठलीही हालचाल केलेली नाही आणि हे वरील सर्व निकष प्रत्यक्ष रुग्णांना सेवा देणे किंवा नियमात न बसणे ा सगळ्या गोष्टी फक्त कंत्राटी कर्मचार्‍यांच्या बाबतीत तपासल्या जातात बाकी परमनंट कर्मचार्‍यांच्या बाबतीत कुठलीही चौकशी न करता फक्त तो पर्मनंट आहे हेच एक नियम पाहून त्यांना सर्व सोयी सुविधा देण्यात येतात त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का आपल्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याची किंवा ज्या जाचक अटी आहे त्या रद्द करण्याची. काम करून घ्यायची अशी जबाबदारी आहे परंतू कर्मचार्‍यांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलण्याची सुद्धा अधिकारी वर्गाने तयारी ठेवावी कारण आपण जशी लेखी पत्र देऊन काम करून घेतो तसे कर्मचार्‍यांच्या बाबतीत होणाऱ्या विविध प्रश्‍नांच्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष बबलू पठाण यांनी केली आहे तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नंदू कासार माजी अध्यक्ष हर्षल बाळासाहेब रणवरे पाटील राज्य संघटक मयूर थारेवाल यांच्या नेतृत्वात माननीय नामदार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन विमान बाबतीत असलेले विविध प्रश्न सुसूत्रीकरण आनंतर जुन्या कर्मचाऱ्यांना न मिळालेली पगारवाढ कर्मचाऱ्यांचे बदलीचा प्रश्न हे विविध प्रश्न घेऊन लवकरच भेट घेण्यात येईल अशी माहिती राज्य संघटनेचे राज्य संघटक मयूर थारेवाल यांनी दिली

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!