भोकरदन तालुका

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक तरुण ठार तर एकजण जख्मी


जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश सपकाळ(३५)व विष्णु निकम(३०) हे काही कामानिमित्त जालना येथे गेले होते माञ शनिवारी रात्री जालन्याहून गावाकडे मोटर सायकल वरुन परत येत असताना  जालना राजूर रोड वरील तपोवन फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक देऊन त्यांचा अपघात झाला त्या अपघातात सतिष सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला विष्णु निकम जख्मी झाला असुन त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु अाहे सतिष सपकाळ यांच्या पश्चात पत्नी ,दोन लहान मुले ,आई-वडील ,भाऊ भावजयी,बहीण असा मोठा परिवार आहे .सतीश सपकाळ हे एक महिन्यापूर्वीच जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथील ज्युनियर कॉलेज वर प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले होते आणि  रुजू होण्यासाठी त्यांना फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता होती .फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी ते जालना येथे  गेले होते .गावी परत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला .जळगाव सपकाळ येथे रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!