उदघाटना पुरतेच विलगीकरण कक्ष, कोरोना रुग्णासह संपर्कातील रुग्ण गावात मोकाटच ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.
जळगाव सपकाळ:—कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडुन विविध उपाययोजना राबविल्या जात अाहे त्यानुसार भोकरदन तालुक्यात विलगीकरण कक्षासाठी गावामध्ये शाळा अधिग्रहित करण्यात अाल्या असुन या कक्षात कोरोना रुग्णाच्या संपर्कात अालेले होम क्वांरटाईन असलेल्या नागरिकांना ठेवण्याचे अादेश प्रशासनाचे अाहे माञ भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील गावात सोमवारी पाच कोरोना रुग्ण अाढळुन अालेले असतांना सुध्दा ना या रुग्णांना व त्यांच्या संपर्कात अालेल्या नागरिकाना गावातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात अाले नसल्याने विलगीकरण कक्ष नुसते उदघाटनासाठीच प्रशासनाने कागदोपञी ठेवले की काय असा प्रकार बुधवारी संबधीत न्यूज जालना प्रतिनिधीने विलगीकरण कक्षाला भेट दिली असता तिथे फक्त ग्रामपंचात कर्मचारी,एक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,अंगणवाडी कर्मचारी यांची विलगीकरण कक्षात नेमणुक केल्याची दिसुन अाले रोज सकाळ संध्याकाळ विलगीकरण कक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्मचार्यांची नेमणुक केलेली अाहे तसेच येथील विलगीकरण कक्षात जळगाव सपकाळ,हिसोडा(खु)हिसोडा(बु) या तीन गावातील कोरोना रुग्णासह संपर्कात अालेल्या नागरिकांना ठेवण्याचे अादेश अाहेत परंतु संबधीत ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक हे प्रतिसाद देत नसल्याने रुग्णांच्या संपर्कातील गावात मोकाट फिरत अाहे त्यामुळे ही गावे कोरोना हाॅटस्फाॅट होण्याची भिती अाहे माञ विलगीकरण कक्षाचे उदघाटन होऊन नऊ दिवस झाले त्यातच या नऊ दिवसांत गावात जवळपास अाठ कोरोना रुग्ण निघाले माञ ना त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात अाले ना त्यांच्या संपर्कातील नागरिकांना ते गावातच मोकाटच फिरत असल्याने गावात कोरोना रुग्णाची वाढ होण्याची शकयता वर्तविण्यात येत असल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत अाहे.
“कोरोना दक्षता समिती नावालाच”
प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोना ग्रामदक्षता समिती स्थापन करुन या समितीने गावात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्यास यावर काय उपाय करता येईल यासाठी दक्षता समिती देखरेखी साठी स्थापन करण्यात अाल्या माञ येथील समिती नावालाच स्थापन करण्यात अाली असल्याचे कळाले.
“याविषयी प्राथमिक अारोग्य केद्राचे वैघकीय अधिकारी डाॅ.हर्षल महाजन यांना विचारले असता गावातील कोरोना रुग्णांना भोकरदन येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यासाठी त्यांना अारोग्य केंद्रात अाणले होते माञ त्यांनी तिथे जाण्यास नकार दिला व गाडी येण्याच्या अगोदरच पाच कोरोना रुग्ण दवाखाण्यातुन पळुन गेले त्यामुळे नागरिकांसह ग्रामपंचायतने सहकार्य करायला पाहिजेत माञ तसे होत नसल्याने अाम्हाला सुध्दा अडचणी येत असल्याचे सांगितले.
“तसेच ऐक मे ते बारा मे पर्यत जळगांव सपकाळ येथील आरोग्य केंद्रा अंतर्गत येणार्या तेरा गावातील ३१कोरोना रुग्ण आढळुन आल्याचे वैघकीय अधिकारी हर्षल महाजन यांनी सांगितले.
तसेच येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना कोरोना संसर्गजण्य परिस्थीतीमध्ये गावातच थांबण्याचे अादेश अाहेत माञ येथे ग्रामविकास अधिकारी अाठ दिवसांतुन ऐकदाच हजेरी लावत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारात ताळमेळच लागत नसल्याचे चिञ निर्माण झाल्याने या कोरोना महामारीच्या काळात गावात दुर्लक्ष होत असल्याचा अारोप ग्रामस्थ करीत अाहेत.
या विषयी ग्रामविकास अधिकारी महेंद्रकुमार साबळे यांच्याशी फोनव्दारे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.