जालन्यात मित्राने काढला मित्राचा काटा
न्यूज जालना
शहरातील गांधी नगर भागात एका मित्राने चाकूने भोसकून दुसऱ्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
श्याम गणपत थोरवे असे मयत तरुणाचे नाव असून संतोष शिवलाल वाघाडे असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत सविस्तर असे की, सोमवारी सायंकाळी मयत श्याम थोरवे आणि आरोपी संतोष शिवलाल वाघाडे यांच्यात जुन्या वादावरून पुन्हा भांडण झाले होते.
या वादातूनच संतोष शिवलाल वाघाडे याने श्याम गणपत थोरवे यास चाकूने भोसकले. यात गंभीर जखमी होऊन श्याम थोरवे याचा मृत्यू झाला.
गांधी नगर येथील ओम साई राम हॉटेल समोर ही हत्या झाली. घटनास्थळी उप विभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी भेट दिली.
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. रात्री उशिरा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.