बदनापूर तालुका

बदनापूर येथे लवकरच डेडिकेटेड कोरोना सेंटर सुरू होणार- मा. आ. संतोष सांबरे


बदनापूर प्रतिनिधी / किशोर सिरसाट
बदनापूर : ता.19 : रोजी
बदनापूर व तालुक्यातील नागरिकांना कोरू ना रुग्णांना मोफत उपचार मिळावे याकरिता बदनापूर येथे लवकरच डेडिकेटेड कोरोना सेंटर सुरू होणार असून यासंदर्भात आज बुधवार रोजी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात माजी आमदार संतोष सांबरे उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदिपान सानप जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी पाहणी केली
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोरोना सेंटर सुरू व्हावे याकरिता पंधरा दिवसापूर्वी माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे एक निवेदन दिले होते त्यामध्ये नमूद केले की बदनापूर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे येथे मोठी बाजारपेठ असून या परिसरातून जालना औरंगाबाद महामार्ग गेलेला आहे व या तालुक्यात ग्रामीण भागातील जनतेला कोरोना वर उपचार करण्यासाठी तालुक्यात शासकीय रुग्णालयात डी सी एच सी सेंटरची सुविधा उपलब्ध नाही संपूर्ण महाराष्ट्रात कोविडच्या साथीने थैमान घातलेले असताना बदनापूर तालुक्यातील कोविडच्या रुग्णांना

images (60)
images (60)


जालना संभाजीनगर किंवा इतर ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागत आहे सध्या गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना पार्श्‍वभूमीवर लॉकडॉउची परिस्थिती व रोजगार बंद असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शेतकरी शेतमजूर कामगारांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे परवडणारे नाही घेण्याची बदनापूर तालुक्यातील नूर हॉस्पिटल वरुडी व बदनापूर शहरात काहीठिकाणी खाजगी डी सी एच सी सेंटर सुरू आहे परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आवश्यक असलेले शासकीय रुग्णालयांमध्ये डी सी एच सी सेंटर असणे गरजेचे आहे या सेंटर मधून रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटि लेटर आय सी यु बेड रेडमिसिविर इंजेक्शनसह मोफत औषधोपचार सुरू करावे बदनापुर येथे टेस्टिंग ट्रेसिंग करून कोरोनारुग्णांचा शोध घेण्यात येत आहे परंतु कोरोना रुग्णांवर ट्रीटमेंट करणारी शासकीय यंत्रणा या तालुक्यात नसल्यामुळे बदनापूर तालुक्यातील जनता महाराष्ट्र शासनाच्या शासनाच्या त्रिसूत्री योजने पासून वंचित राहत आहे बदनापूर ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांची सुविधा उपलब्ध आहे परंतु याठिकाणी गोरगरीब जनतेसाठी डी सीएससी सेंटर सुरू करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही सर्वसामान्य जनतेला लाखो रुपये खर्चून खाजगी दवाखाने किंवा जालना संभाजीनगर तेथे जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे बदनापूर येथे 30 खाटांची इमारत असतानासुद्धा व कोरोना कोरोना सारख्या महामारीने रौद्ररूप धारण केलेले असताना बदनापूर येथे कॉल सेंटर सुरु करणे संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन मागणी केलेली असताना सुद्धा बदनापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी बदनापूर येथे डी सी एच एस सी सेंटर सुरू करण्या संबंधी कोणतीही कारवाई झालेली नाही महाराष्ट्रात सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसताना बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वच्या सर्व 30 बेड धूळखात रिकामी पडलेले आहे प्रशासकीय अनास्था व इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रशासकीय पातळीवर या बाबतीत दुर्लक्ष झाल्याची अतिशय गंभीर बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे बदनापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की बदनापूर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरू करण्यात यावे व राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी कोरोणा संदर्भातील तिसऱ्या लाटेची ही शक्यता वर्तवली आहे त्यासंदर्भातील उपाययोजना म्हणून बदनापुर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सचिवांना याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदिपान सानप व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पाटील यांना आज बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पाठविले यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हे सेंटर सुरू करण्यासाठी येथील इमारतीची डागडुजी पाणीपुरवठा वीजपुरवठा ऑक्सिजन पुरवठा आवश्यक असलेले साहित्य व मनुष्यबळ याबाबत या दोन्ही अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली व याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत औद्योगिक वसाहत अशा विविध अधिकाऱ्यांना तातडीने येथील कामे सुरू करण्याची मागणी केली त्याबाबत नियोजन करण्याची विनंती केली यावर या दोन्ही अधिकाऱ्यांनी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कॉल सेंटर सुरू करण्यासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले त्यामुळे बदनापूर ग्रामीण रुग्णालयात लवकरच डेडिकेटेड करून सेंटर सुरू होणार असल्याचे दिसत आहे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत वाडीकर तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे जिल्हा समन्वयक भरत सांबरे जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण अंकुश शिंदे नंदकिशोर दाभाडे वैजनाथ शिरसाट, श्रीराम कान्हेरे, संतोष नागवे,कैलास खैरे बाबासाहेब शिंगारे आदींसह अनेक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!