मौजे डावरगाव येथे रुंद सरी वरंबा (BBF)पद्धतीने पिकांची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक संपन्न
बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
बदनापूर ता: 19 रोजी डावरगाव ता. बदनापूर येथे रुंद सरी वरंबा पद्धतीने पिकांची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शेतकरी बांधवाना दाखविण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री. व्ही. एस. ठक्के यांनी या लागवड पद्धतीचे फायदे उपस्थिताना सांगितले.त्यामध्ये बियाण्याची बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ, सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास अधिकचे पाणी वाहून जाऊन पिकाचे अति पावसाने होणारे नुकसान टाळले जाते तसेच दीर्घाकालीन पावसाचा खंड पडल्यास या पद्धतीमुळे दीर्घ कालीन ओलाव्याचा पिकास फायदा होतो, जमिनीची धूप कमी होते.तसेच तालुक्यातील प्रत्येकी 500 हे. क्षेत्र हे रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड व मृत सरी काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. ठक्के यांनी सांगितले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्री. ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाला उपविभागीय कृषि अधिकारी, जालना श्री. एन. आर. कोकाटे, मंडळ कृषि अधिकारी , दाभाडी श्री.आर. एम. राठोड, कृषिपर्यवेक्षक श्री. पी. पी. घुनावत, कृषीसहाय्यक ,श्री ढवळे,बी. पी.चिंचोले, एम. जी.कोरडे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.