बदनापूर तालुका

जळगाव सपकाळ येथे कोल्हापुरी बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी मिळाला वीस लाखाचा निधी


जळगाव सपकाळ:—भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील तीन कोल्हापुरी बंधार्‍याची गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेली होती.अाता जिल्हा परिषद सदस्या सुनिता शिवाजी सपकाळ यांनी कोल्हापुरी बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करुन दोन बंधार्‍यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत २०लाख रुपये निधी मंजुर झाला असुन त्या बंधार्‍याच्या कामाला सुध्दा सुरुवात झाली असल्याने ला खो लिटर पाणी अडणार असल्याने परिसरातील जमीनी सुपीक होणार असुन रब्बी हंगामात यांचा फायदा शेतकर्‍यांना होणार अाहे.
जळगाव सपकाळ येथे सन १९९५ते २००० या काळात तीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात अाले होते माञ गेल्या बारा ते दहा वर्षापासुन बंधार्‍याची दुरावस्था झाल्याने पाणी साठवण होत नसल्याने बंधारे शोभेची वस्तु ठरले होते माञ अाता जिल्हा परिषद अंतर्गत बंधार्‍याच्या दुरुस्तीला निधी मिळाला असल्याने बंधार्‍याची दुरुस्ती झाल्यावर बंधार्‍या शेजारील परिसरातील शेतकर्‍याच्या २०० हेक्टर जमीनीचे सिंचन क्षेञाचे ओलीताखाली रुपातंर होऊन क्षेञ सुजलाम सुफलाम होणार असल्याने शेतकरी वर्गात अानंदाचे वातावरण अाहे.
तसेच वीस वर्ष अगोदर झालेल्या ग्रामीण भागातील अनेक कोल्हापुरी बंधार्‍याचे दरवाजे चोरीला गेलेले अाहेत त्यातच अनेक गेट पाण्याच्या दबावामुळे वाहुन गेले असल्याने अाता जुन्या कोल्हापुरी बंधार्‍याची दुरुस्ती ही सिंमेट बंधार्‍यात होणार असल्याने मोठया प्रमाणात पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार अाहे त्यामीळे कोल्हापुरी बंधार्‍याचे रुपांतर सिंमेट बंधार्‍यात होणार अाहे.
“पाठपुराव्याला मिळाले यश”
जळगाव सपकाळ येथील दुरावस्था झालेल्या कोल्हापुरी बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी वारंवार जिल्हा परिषदेमध्ये अावाज उठवला अखेर अाता जिल्हा परिषद फंडातुन दुरुस्ती साठी वीस लाख रुपये मंजुर करुन घेतल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुनिता शिवाजी सपकाळ यांनी सांगितले.
“कोल्हापुरी बंधार्‍याची दुरुस्ती होत असल्याने परिसरातील शेतकर्‍याना बंधार्‍यात पाणी साठवण पुढील काळात होणार असल्याने जमीनी ओलीताखाली येणार अाहे त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सुजलाम सुफलाम होणार असल्याचे अार.ए. सपकाळ ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले.
“बंधार्‍याची दुरुस्ती होणार असल्याने मोठया प्रमाणात पाणी साठणार असल्याने त्यामुळे शेतकर्‍याच्या विहीरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकर्‍याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे येथील शेतकरी मुरलीधर सपकाळ यांनी सांगितले.
फोटो ओळी. जळगाव सपकाळ येथील कोल्हापुरी बंधार्‍याच्या दुरुस्तीचे उदघाटन करतांना जिल्हा परिषद सदस्या सुनिता सपकाळ,प्रियंका सपकाळ,वैशाली सपकाळ,आर.ए.सपकाळ,बन्सी वर्पे,भास्कर सावळे,पप्पु सपकाळ,विनोद सपकाळ यांची उपस्थीती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!