मराठावाडा

कोरोना रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.आशिष राठोड यांचे मोठे योगदान

images (60)
images (60)

न्यूज जालना प्रतिनिधी

कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथील डॉ.आशिष राठोड हे मागील एका वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता जालना जिल्ह्यातील ४० हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्णांवर यशस्वी उपचार करून बाधित रूग्णांना कोरोनामुक्त केले आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी डॉ.राठोड हे देवदूत ठरला आहे.

कोरोना तज्ञ म्हणून डॉ.राठोड यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.ग्रामीण भाग असो किंवा शहरी तर डॉ आशिष राठोड यांना दाखवले का अशी सर्वसामान्यात चर्चा असते.जालना जिल्ह्यात मागील एप्रिल महिन्यात पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून डॉ राठोड हे कुटुंबीयांना फक्त तीन ते चार तास वेळ देत असतात.बाकीचा वेळ रूग्णांसाठी देतात.केवळ रुग्णांना प्राथमिकता दिली आहे.डा. राठोड हे कोरोना बाधित रूग्णांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा मौखिक सल्ला देत असतात.गेल्या वर्षी कोरोना हा आजार नविनच होता.रूग्णांवर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत असा प्रश्र्न जागतिक आरोग्य संघटनेसमोर निर्माण झाला होता.मात्र उपलब्ध साधने व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचा डोस वापरून रूग्णांना होणारा त्रास कमी करून आज बाजारात उपलब्ध असलेले रेमडेसिविर इंजेक्शन व पर्यायी गोळ्या औषधे देऊन डॉ आशिष राठोड हे अनेक कोरोना बाधित रूग्णांना बरे केले आहे. मागील एका वर्षापासून डॉ राठोड हे जालना जिल्ह्यात कोरोना तज्ञ म्हणून नावारूपाला आले आहे.जिल्ह्यातील‌ तब्बल ४० हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डॉ.आशिष राठोड यांना अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही हे विशेषच म्हणावे लागेल.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!