समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-के.के.पवार
येत्या 9 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथे समनक जनता पार्टीच्या लोकार्पण ऐतिहासिक व दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यात अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात करून येणाऱ्या काळात पार्टीचे पुढील धोरण निश्चित होणार आहे त्यातील लोकशाही बळकट होण्यासाठी व संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते के.के पवार यांनी केले आहे.देशाला स्वांतत्र मिळून अनेक वर्ष उलटली आहे परंतु बहुजन उपेक्षित वर्गाना सामजिक न्याय अनुशेष उणीव भासत आहे.शेतकऱ्याचे मुख्य प्रश्नांना निराकरण करण्यासाठी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी,बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या व्यापक हेतुने समनक पार्टी काम करेल असे सुतोवाच मान्यवर मंडळीकडून करण्यात आले यासाठी आपल्या न्याय हक्क अधिकार याची जणिव ठेऊन घनसावंगी तालुक्यामधुन सर्व जनतेने या सोहळ्यात उपस्थित राहुन कार्यकर्मची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले.