धोपटेश्वर येथे कोविड 19 लसीकरणाची मोहीमेला सुरवात
बदनापूर प्रतिनिधी/किशोर सिरसाट
बदनापूर ता.28 : धोपटेश्वर येथे
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण गावावर येणारे संकट टाळण्यासाठी तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर ग्रामपंचायतीने केला आहे.तालुक्यातील हे तीन हजार लोकसंख्याच गाव आहे.
गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे स्वयंस्फूर्तीने प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या
जिल्हा प्रशासनाच्या वतीने बदनापूर येथील तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळत सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली होत्या.
तसेच पन्नासपेक्षा जास्त गावातील सरपंचांनी उपस्थिती दर्शवित माझे गाव, संपूर्ण लसीकरण असलेले गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प केला.
बदनापूर तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्या तरी धोपटेश्वर गावाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यासोबतच तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करुन लसीकरणासाठी पात्र नागरिकांना प्रवृत्त करुन त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी गावातील सरपंचांची व उपसरपंच भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
गावाचा प्रमुख म्हणून या नात्यानेबविशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच फुलमाळी व उपसरपंच नंदकिशोर दाभाडे यांनी नागरिकांना या पूर्वी वेळी केले होते.
लसीकरणासंदर्भातील नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गावनिहाय मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी गावातील सरपंच व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी स्वीकारावी. तसेच माझे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले पाहिजे.
धोपटेश्वर गावात पाचशेच्या वरती लोकांनी लस घेतली आहे.
गावात आत्तापर्यंत चार कॅम्प घेण्यात आले आहे..
कोरोनावरील लस प्रभावी व परिणामकारक असून नागरिकाने गावात लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच व उपसरपंच यांनी गाव सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहिमेला गावकऱ्यांनी सहकार्य करावे.
या लसीकरणाच्या मोहिमेसाठी घेणारे सरपंच फुलमाळी, उपसरपंच श्री.नंदकिशोर दाभाडे,डॉ. भाग्यवंत मॅडम, डॉ. प्रकाश चौधरी, ग्रामविकास अधिकारी बी. जी. पंजाबी, ग्रामपंचायत संगणक परिचालक गणेश शेळके यांचे मोठे सहकार्य लाभले…