भोकरदन तालुका

विवाहसोहळयात अनाठायी खर्च न करता अादर्श उपक्रम राबवत नवदापत्यांनी वाटप केले शंभर वृक्ष


जागतीक पर्यावरण दिनाला वृक्षसंवर्धनेचा दिला संदेश.
जळगाव सपकाळ :—दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा र्हास व त्याकडे शासनाचे होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्षाने वनसंपदा धोक्यात आली आहे,शिवाय राज्यभरात मागील महिन्यात कोरोना महामारीमुळे अाॅक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले अाहे,यासाठी माणसाच्या आयुष्यात वृक्षाचे किती अन्यनसाधारण महत्त्व आहे,येणाऱ्या काळात वृक्ष जगेल तर माणुस जगेल याची पूरेपुर जाण ठेवत पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एका नवदामप्त्यांने शुक्रवारी शेलुद येथे पार पडलेल्या आपल्या लग्न सोहळ्यात वृक्ष वाटपाचा एक आगळावेगळा उपक्रम राबवित लग्नात अनाठायी खर्च न करता समाजात एक वेगळा आदर्श घालवुन दिला आहे,हा विवाह सोहळा भोकरदन तालुक्यातील शेलुद येथे साध्या पद्धतीने पार पडला आहे,हा पुढाकार वर पक्षातील जळगाव सपकाळ येथील छञपती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ गणपतराव सपकाळ यांनी घेतला आहे..लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या हाती तसेच अापल्या सासुरवाडीतील लोकांना १०० वृक्षाचे वाटप केले आहे..
दरवर्षी मोठया प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीमुळे घनदाट जंगलातील झाडे नष्ट होत अाहे,त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास व त्यापासुन निर्माण होणारा दुष्काळ,हे मानव जिवनाला नक्कीच हानी देणारे आहे,दरम्यान कोरोना संसर्गामुळे अाॅक्सिजनची कमतरता भासुन अनेकांना आँक्सीजन अभावी आपला जिव गमवावा लागला आहे’,बेसुमार वृक्षतोड झाल्यानेच आँक्सीजनची कमतरता भासली असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे, करिता जळगाव सपकाळ येथील गोकुळ सपकाळ यांनी शुक्रवारी विवाह सोहळयात पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी वड,पिंपळ,अडुळसा,कडुनिंब या १०० वृक्षाची झाडे वाटप केले त्यामुळे विवाहसोहळयात झाडे लावा झाडे जगवाचा संदेश नवदापत्यांनी दोन्ही गावातील युवा पिढीसह ग्रामस्थांना दिला.
“पर्यावरण वाचवण्यासाठी छञपती सेनेच्या माध्यमातुन तसेच कोरोनामुळे अाॅक्सिजनची कमतरतेमुळे प्राण गमावलेल्याना श्रध्दांजली म्हणुन मी माझ्या विवाह सोहळयात १०० वृक्षाचे वाटप केले तसेच वृक्षसंवर्धनेचा संदेश दिला असल्याचे जळगाव सपकाळ येथील छञपती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ सपकाळ यांनी सांगितले……फोटो औळी….आपल्या लग्न सोहळ्यात विविध जातीचे वृक्ष वाटप करताना वर-वधु…

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!