दिवाळी अंक २०२१भोकरदन तालुका

भोकरदन शहरातील मजुराची गळफास घेवुन आत्महत्या

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरातील माळी गल्ली परिसरात एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे बाळू रमेश जाधव वय 43 अशे मयताचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार बाळू याने घरा जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गेल्या वीस वर्षा पासून माळी गल्ली परिसरात वास्तव्यास असलेल्या मध्यम वर्गीय मजूर बाळू जाधव हे हाती मिळेल ते काम करीत होते तर सोबत त्यांना आचारी काम येत असलेल्या कुठल्याही हॉटेल ला नास्ता बनून देत मात्र गेल्या वर्षांपासून कोरोना मुळे सर्वच व्यापार ठप्प होते या मुळे हाती असेल ते ही काम बंद पडले याच निराशेपोटी बाळू जाधव याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच भोकरदन बिट जामदार के.डी. दाभाडे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविले होते तर मंगळवारी यांच्यावर शवविच्छेदन करून भोकरदन समशान भूमी मध्ये सकाळी अकराच्या दरम्यान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते बाळू जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!