दे धक्का,वालसावंगीच्या रुग्णवाहिकेची दुरवस्था
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील रुग्णवाहिका सोळा वर्ष पूर्वीची असल्याने खटारा झाली असून वारंवार त्यामध्ये सातत्याने बिघाड होत असून रुग्णांना उपचार करण्यासाठी तसेच महिलेच्या प्रसुतीसाठी उपचार करण्यासाठी ने आण करताना नेहमी कोठेही जंगलात तसेच रस्त्यावरील मोठ- मोठ्या खड्डे व व रस्ता पार करताना बंद पडत असून रुग्णांची मोठी दमछाक होत आहे तसेच धक्का मारून रुग्णवाहिका सुरू करावी लागते आहे तसेच रुग्णवाहिकेत शिल्लकचे डिझेल भरलेले नसते तसेच रूग्णवाहिकेच्या बँटरी खराब झालेली असते तसेच रात्रीच्या वेळेस रुग्णांना ने आण करताना लाईट वारंवार बंद पडतात.
अशा अवस्थेत वाहनांची दुरवस्था झाली असून मोठा त्रास सहन करावा लागत असून आजही एका महिलेला प्रसूतीसाठी रुग्ण महिला इतरत्र घेऊन जाताना ही रुग्णवाहिका मध्येच बंद पडली यामुळे मोठा त्रास रुग्णांना,नातेवाईकांना सहन करावा लागला यापूर्वी देखील अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत .येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची अनेकवेळा मागणी करून सुद्धा अजूनही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आली नाही काही दिवसांपूर्वी इतर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गरज असताना सुद्धा रुग्णवाहिका देण्यात आली नाही.त्यामुळे तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिक्रिया : वालसावंगी हे भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे गाव,सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका न देणे खरोखरच आश्चर्यकारक आहे.डावलने चुकीचे आहे.आज ही रुग्णवाहिका रस्त्यावरच बंद पडलेली आहे.आता अशात रुग्णांना इतरत्र कसे घेऊन जावे असा प्रश्न असून आरोग्य विभागाने तातडीने येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची गरज आहे.
- ज्योती प्रकाश पवार ( पंचायत समिती सदस्य)