मुलीस पळूवून नेणा-या आरोपी बंडू सुरेश तौर यांच्या संबधी माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे परतुर पोलीसांचे आवाहन
जालना, दि. 8 – 17 वर्षाच्या मुलीचे दि. 2 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मौजे शिंगोना ता. परतूर येथून अज्ञात इसमाने पळवून नेउुन अपहारण केले असल्याची फिर्याद परतुर पोलीस ठाणे येथे दि. 3 दिसेंबर 2020 रोजी फिर्यादी नामे अच्युतराव सोळंके व 50 वर्षे व्यवसाय शेती रा. मौजे शिंगोना ता. परतूर यांनी नोंदवली आहे.
अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळून नेले त्यावरुन विषयात नमूदप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत या गुन्ह्यात बंडू सुरेश तौर रा शिंगोना ता. परतूर यानेच मुलीला अज्ञात कारणासाठी अपहरन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरी पुढीलप्रमाणे अपहरित मुलीचे वय 17 वर्षे, उंची 5 फुट,रंग गोरा, अंगाने मध्यम, नाक सरळ ओठ बारील,कान मध्यम व कानामध्ये बारीक फुल अंगात पंजाबी ड्रेस,पायात चप्पल शिक्षण 10 वी भाषा हिंदी. वर्णनाची मुलगी
आरोपी बंडू सुरेश तौर रा. शिंगोना ता. परतूर याचे नाव बंडू सुरेश तौर,रा. शिंगोना ता. परतूर रंग गहू वर्ण, उंची पाच फुट,पेहराव जिन्स पॅन्ट शर्ट,पायाल सॅन्डल,भाषा मराठी,हिंदी या वर्णनाचा आरोपी कुणाला आढळल्यास एस.एस. बोडखे, पोउपनि- 7020060877 पोलीस ठाणे परतूर टेलीफोन नंबर 02484-221033 यावर संपर्क साधावा असे आवाहन एस.एस. बोडखे पोलीस उप निरिक्षक पोलीस ठाणे परतूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.