जालना जिल्ह्यासाठीकोव्हॅक्सीनचे 8 हजार 500 डोस प्राप्त
जालना, दि. 8 :- जालना जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीनचे लसीचे 8 हजार 500 डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय जालना यांना वाटप करण्यात येत आहे.18 ते 44 वयोगटातील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लेवल वर्कर यांचा दुसरा डोस दि. 5 जुन 2021 पासुन देण्यात येत असुन त्यासाठी त्यांना लसीकरण केंद्रावर ओळख पत्र दाखवुन जिल्ह्यातील नियोजित सर्व सत्रात लस मिळेल. लसीपासुन वंचीत असलेले 45 वर्ष व अधिक वयोगाटातील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करुन घेणे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही.18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील त्रिसुत्रीचा वापर करावा मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी माहीती दिली आहे.