भोकरदन तालुका
पेरजापुर व सुभानपुर येथे एकुण 152 व्यक्तींनी घेतला “कोविशिल्ड”चा पहीला डोस
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पेरजापुर व सुभानपुर या दोन्ही गावात नुकतेच ग्रामपंचायतीच्या आणि आरोग्यविभागाच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण शिबीर आयोजीत करण्यात आले होते.यामध्ये १५२ जनांनी लस घेतली.
दोन्ही गावातील नागरीकांनी या शिबिरास लक्षणीय प्रतिसाद दिला असुन अनुक्रमे पेरजापुर येथील 92जणांनी व सुभानपुर येथील 60जणांनी कोविशिल्ड लसीचा पहीला डोस घेतला.
ये शिबीर यशस्वी करण्यासाठी पेरजापुर ग्रामपंचयातचे सरपंच किशोर जाधव,ग्रामसेवक राजु दवंगे,सुभानपुरचे सरपंच योगेश गाढे, ग्रामसेवक एस.जी पवार,संगणक परीचालक नवनाथ नामदे,आरोग्य उपक्रेद आव्हानाचे डाँ विजय लकवाल डाँ मोरे मँडम,डाँ पठाण मँडम,डाँ जैन आदीसह दोन्ही ग्रामपंचायतचे सदस्य ,कर्मचारी,आशासेविका,
अंगणवाडी सेविका आदींचे सहकार्य लाभले.