रुग्णाच्या मदतीसाठी धावुन आले मदत फाउंडेशन,दोन दिवसात जमा केले १ लाख ३० हजाराची मदत
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील मदत फाउंडेशन नेहमीच गरजुना मदत करण्यासाठी तत्पर असुन दोन दिवसापुर्वी बरंजळा साबळे येथिल एका युवकाला अपघातात जबर मार लागल्याने त्याला उपचारासाठी अर्थिक मदत हवी होती,मदत फाउंडेशच्या वतीने दोन दिवसात १ लाख ३० हजाराची मदत जमा करुन उपचारासाठी देण्यात आली आहे.
केदारखेडा रोड जवळ दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता या अपघातात माधव साबळे यांना जबर मार लागला होता आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यांना जालना येथिल दीपक हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी पायाच्या ऑपरेशन करायचे सांगितले तर त्यासाठी साठी त्यांना अर्थिक मदतीची गरज होती. मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ यांच्यातर्फे सर्वांना सोशल मिडियाव्दारे आवाहन करण्यात आले की आपल्या परीने 10/20/50/100/500/1000 रुपये असं मदतीचे आवाहन करण्यात आले तब्बल दोन दिवसांमध्ये दिनेश पाटील पडोळ व भागवत साबळे यांचे अकाउंटला तब्बल एक लाख तीस हजार मदत झाली आज ती मदत बराजळा साबळे येथे माधव साबळे यांच्या नातेवाईकांकडे नेऊन देण्यात आली त्यावेळी मदत फाऊंडेशन चे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ व अमोल देशमुख भागवत साबळे कल्याण साबळे पुंजाराम साबळे आदी उपस्थित होते.