जाफराबाद तालुकाभोकरदन तालुका

राष्ट्रवादी युवक कांग्रेस भोकरदन च्या वतीने पंतप्रधानांना 50 हजार पत्र पाठवून मराठा आरक्षणाची मागणी करणार:- प्रा डॉ अंकुश जाधव

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन दिन निमित्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे.
त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.अंकुश जाधव पाटिल अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 50 हजार पत्रं पाठवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ भोकरदन येथिल पोस्ट ऑफिस येथे करण्यात आला.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवकने नवी मोहीम हाती घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे. मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच केंद्र सरकारच सोडवू शकणार आहे. मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. याविषयी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे. हाच धागा पकडत व पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनानिमित्त ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम विधानसभा व विभाग निहाय राबविली जात आहे. विधानसभा व विभागातील अध्यक्षांनी आपल्या भागातील नागरिकांना या मोहिमेत सहभागी करण्याचे आवाहन युवक तालुकाध्यक्ष प्रा डॉ अंकुश पाटिल जाधव यांनी केले आहे.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजातील तरुणांच्या भावना लक्षात याव्यात यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी करणारे पत्र पाठविण्याचे आवाहन युवक प्रदेशाध्यक्ष यांनी केले होते सदरील आवाहनानुसार भोकरदन तालुक्यातून माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे, प्रदेश उपाध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष कपिल आकात, यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 50000 पत्र पाठवून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे तर या पत्र मोहिमेचे सुरुवात भोकरदन शहरात तील पोस्ट ऑफिस येथे भोकरदन युवक तालुकाअध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पत्र पाठवून शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रा डॉ अंकुश पाटील जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रा संग्राम राजे देशमुख, रामेश्वर पाटिल जंजाळ, नगरसेवक शेख कदीर बापू ,नगरसेवक नसीम पठाण, महेश औटि, विशाल पोटे, सुनील पिसे, सय्यद आरेफ, नजीम शाह, सचिन गिरणारे, गोपाल राजपूत, सोमीनाथ जाधव, अमोल मिरकर, गजानन सहाने, संदीप सहाने, गंगाधर हजारे, साबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!