जाफराबाद तालुका

पत्रकारावरील जिवघेण्या हल्ल्याचा निषेध,जाफराबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासनाला निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)


जाफराबाद येथिल पंचायत समितीसमोरील चौकात एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर सिने स्टाईलने वाळु माफियांनी लाठया काठयांनी जीवघेणा हल्ला दि.११ जुन रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केला. त्यात त्याच्या डोक्याला आणि शरीरावर मार लागल्याने
ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय जालना नंतर खाजगी (अपेक्स) हाँस्पीटल औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले.

पत्रकारावरील झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे.
यासंबंधी नायब तहसिलदार केशव डकले ,पोलीस उपनिरिक्षक नितीन काकरवाल,युवराज पोठरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाफराबाद तालुक्यातील वाळु चोरीविरोधात वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा राग मनात धरुन वाळु माफियांनी जिवघेणा हल्ला पत्रकारावर केला आहे.असेच हल्ले
ईतर दैनिकाच्या ग्रामिण पत्रकारावर झाले आहे.त्याची पोलीसांनी चौकशी करुन त्यांचेविरुध्द पत्रकार संरक्षण कायदयान्वये दोषीविरुध्द कारवाई
करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रदिप बोबडे,मोहन मुळे,प्रकाश मिरगे,पांडुरंग राऊत,अलकेश सोमाणी,बालाजी शेवाळे,चेतन बायस,उदय मुळे,
गजानन सपकाळ ,मुकेश भारव्दाज,सय्यद अय्युब ,शेख अजीम,तालेब पठाण,विशाल वाकडे,नितीन राउत,विनोद वाघ,मंगल भारव्दाज,मुजाहेद खाँन,
विनायक पंडीत,संतोश शेळके,प्रल्हाद लोणकर,हरीभाउ भालके,असलम पठाण,यांच्या सहया आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!