घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

आशा व गतप्रवर्तकाच्या वतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील राणीऊंचेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व आशा वर्कर आणि गतप्रवर्तक यांच्या वतीने सोमवार (ता.१४) प्राथमिक आरोग्य केंद्र राणीऊंचेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ बोने याना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

कोरोना काळात काम करणाऱ्या आशा गतप्रवर्तकाना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे. कोविड कामकाजा करिता नुसती योद्धा म्हणून शाबासकी न देता किमान प्रतिदिन गतप्रवर्तकाना 500 रु , आणि आशा यांना 300 रुपये भत्ता देण्यात यावा,कोविड लसीकरण करण्याचे काम आशा व गतप्रवर्तकाना देण्यात येऊ नये , आशा व गतप्रवर्तकाना काढून टाकण्याची धमकी देऊन दबाव टाकून काम करून घेण्यात येऊ नये. ऑनलाईन कामकाजाचा आणि इतर लागणारा स्टेशनरी खर्च देण्याची तरतूद करण्यात यावी.तसेच सर्व सुरक्षा साहित्य देण्यात यावे .आता पर्यंत चे आशा गतप्रवर्तकाचे थकीत मानधन मोबदला वाढीव रकमेसह त्वरित देण्यात यावा आदी मागण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी 15 जून 2021 पासून राज्यातील सर्व आशा व गतप्रवर्तक राज्यव्यापी संपावर राहणार आहेत. आशा गतप्रवर्तक संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहेत. हे निवेदन देताना आशा वर्कर आम्रपाली अनिरुध्द म्हस्के,अनिता लोंढे,यमुना कुहिरे,सुरेखा गुढेकर, नंदा जाधव ,सुमैया पटेल,व गतप्रवर्तक चंद्रकला जाधव,संगीता हरबक यासह सर्वच आशा वर्करच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!