चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी केली गोळीबार,भोकरदन शहरात खळबळ
मधुकर सहाने : भोकरदन
कल्याण एटीएम फोडणारी टोळी चा पाठलाग सुरू असताना आरोपी चारचाकी वाहनातून पळ काढत असल्याचे लक्षात येताच परभणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी वर भोकरदन येथिल जाफराबाद रोडवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत.
पोलिस पथकातील एका अधिकाऱ्यांनी आरोपी घेऊन पळत असलेल्या वाहनास चाकावर फायरिंग केली मात्र हुकल्याने आरोपी वाहन घेऊन पसार झाला आहे तर टोळीतील इतर काही आरोपी शहरात असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत ही घटना बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात घडली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एटीएम फोडणाऱ्या परराज्यातील टोळीचा बुधवारी औरंगाबाद येथून पाठलाग करत होते पाटलागच्या दरम्यान ही टोळी भोकरदन शहरातील जाफराबाद मुख्य रस्त्यावरील केळणा नदीच्या पुलावर थांबले ची माहिती या पथकाला मिळाली यावेळी टोळीतील आरोपींपैकी काहीजण शहरातील काहीतरी खरेदीसाठी उतरले तर चारचाकी वाहनात असलेल्या संशयित आरोपीला पोलिस मागावर असल्याचे समजताच त्यांनी वाहनातील आरोपींनी वाहन भरधाव वेगाने पळवायला सुरुवात केली पोलीस पथकाने पाठलाग सुरू केला या दरम्यान पोलिस पथकातील एकाने आरोपीच्या वाहनाच्या टायराच्या दिशेने गोळी झाडली मात्र नेम व पुलावर वाहनांची गर्दी फायदा घेत आरोपींनी पळ काढला दरम्यान या प्रकारानंतर वाहनातून उतरलेले टोळीतील इतर आरोपी गर्दीत पसार झाल्याचे समजते पोलिसांनी शहरातील व परिसरातील विविध भागांमध्ये शोध मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहेत.
अचानक घडलेल्या या फिल्मी स्टाईल प्रकाराने भोकरदन शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पथकातील पोलिसांशी या प्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले या प्रकरणाची आम्हाला एक पूर्वकल्पना नव्हती मात्र शहरात गोळीबार झाल्याने समजले तेव्हा आम्ही घटनास्थळी धाव घेतली या कारवाई संदर्भात पथकातील अधिकारीशी संवाद साधला जात असल्याची माहीती पोलीस निरीक्षक वळवी यांनी दिली.