भोकरदन तालुका

पीककर्ज काढण्यासाठी बॅंकेत गेलेल्या शेतकर्याला तुया बापाचा नौकर नाही म्हणत बॅंक अधिकार्यांनी केली मारहाण

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या मॅनेजरसह बॅंकेतील इतर कर्मचारी,अधिकारी व शिपायांनी पीककर्ज काढण्यासाठी बॅंकेत गेलेल्या शेतकर्याला बेदम मारहाण केली असल्याचा घटना आज दुपारी घडली आहे.

दत्तु शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकर्याच नाव असुन तो भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथिल रहिवासी आहे.पीककर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बॅंक आॅफ इंडिया भोकरदन येथे गेला होता.बॅंकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असतांना शिपायाने बॅंकेचे गेट बंद केले आणि आता वेळ संपली उद्या या असं सांगितले.यावरुन या शेतकर्याने मॅनेजरकडे पीककर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केली असतांना मॅनेजरने या शेतकर्याला तुझ्या बापाचा नौकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली.यावेळी शिपाई आणि बॅंकेतील अधिकार्यांनी देखिल या शेतकर्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.दरम्यान मारहाण करणार्या अधिकार्यासह बॅंकेतील दोषी कर्मचार्यांवर कारवाईची मागणी शेतकरी वर्गातुन जोर धरत आहे.

शेतकर्याला मारहाण करणार्या मुजोर बॅंक अधिकारी आणि कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा शेतकर्याला मारहाण करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना बदाडुन काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला आहे.

१८ जुन रोजी सकाळी sbi बॅंकेसमोर शेतकरी ठिय्या अंदोलन करणार भोकरदन तालुक्यातील शेतकरी बांधवांला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ SBI भोकरदन समोर दिनांक 18 जुन रोजी सकाळी ठीक दहा वाजता ठिय्या आंदोलनासाठी सर्व शेतकरी व तालुक्यातील सामाजिक व राजकिय संघटना या ठिय्या अंदोलनाला आणि शेतकर्याला पाठींबा देण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!