घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल रक्कम अदा करण्यास विलंब; ऊस गाळप शेतकरी हतबल

थकीत रक्कम बिल अदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

कुंभार पिंपळगावसह परीसरातून समर्थ सहकारी साखर कारखाना लि.अंकुशनगर यांच्या वतीने मौजे.आमडापूर जि.परभणी येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्यास कुंभार पिंपळगाव परीसरातून हजारो मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आला आहे.मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुढे गळीत केलेल्या ऊसाची बिले रक्कम कारखान्यांनी अद्याप अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध करून दिला‌.परंतु ऊसाचा गाळप होऊन सलग चार महिने उलटून गेले तरी अद्यापपर्यंत ऊस गाळप शेतकऱ्यांचे बिल रक्कम अदा न झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल बनला आहे.सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना औषध फवारणी,बि-बियाणे,खते खरेदीसाठी पैसाची गरज भासत आहे. परीणामी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात उभे राहून व्याज्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे.श्री.लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्यास ऊस देऊन चार महिने झाले तरी अद्याप एक रूपया सुद्धा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.उसाच्या बिलासंदर्भात येथील शेतकीय अधिकारी यांना विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.कारखान्यावर हेलपाटे मारूनही कुणीही जबाबदार अधिकारी भेटत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.सदरील कारखान्याचे चेअरमन,संचालक, कार्यकारी संचालक यांनी याकडे लक्ष देउन शेतकऱ्यांचे असलेले थकीत बिल रक्कम तातडीने अदा करावेत, अशी मागणी विरेगव्हाण तांडा येथील शेतकरी मोकिंद पवार,कुंडलिक पवार, काशिनाथ पवार, बाबुराव पवार, विनोद पवार, गजानन पवार,मदन पवार, बापुराव पवार, रामेश्वर राठोड यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

“येथील साखर कारखान्यास माझ्या सहा एकरांमधुन २५४ मे.टन ऊसाचा गाळप झाला आहे.मागील मार्च महिन्यात उसाचा गाळप होऊन दमडीही मिळाली नाही.त्यामुळे मला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.”

मोकिंद पवार
शेतकरी,विरेगाव तांडा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!