शेतकर्यांना शिवीगाळ व मारहाण करणार्या कर्मचार्यांचे तात्काळ निलंबन करा,तासभर शेतकर्यांचे बॅंकेसमोर ठिय्या आंदोलन
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शेतकऱ्याने पीक कर्जासंदर्भात चौकशीसाठी कर्मचाऱ्याला विचारणा केली असता कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला अरेरावी व शिवीगाळ करत मारहाण केली,मारहाण करणार्या कर्मचार्यांचे तात्काळ निलंबीत करा या मागणीसाठी शेतकरी व काही संघटनांनी बॅंकेसमोर ठिय्या आंदोलन केली.
शेतकऱ्यांने पीककर्जविषयी माहिती घेण्यासाठी बँकेतील अधिकारी इमान पठाण यांच्याकडे चौकशी केली असता अधिकारी पठाण यांनी मी तुझ्या बापाचा नौकर आहे का अश्या शब्दात अरेरावी करत गेटच्या बाहेर येऊन मारहाण केली.बँकेतील सुरक्षारक्षक येथे उपस्थित असतांना जर अधिकारी असे धावून येत असेल तर शेतकन्यांनी न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न सर्वांना पडत आहे . येथील अधिकारी कर्मचारी यापूर्वीही अपंग वृद्ध , महिलांना गैरवर्तन गैर वागणूक देतात . यापूर्वी ही अश्या अनेक घटना घडलेल्या आहेत.तसेच येथील पीककर्ज वाटपात सुद्धा मोठा गैरव्यवहार झालेला आहे . याची विभागीय चौकशी करण्यात यावी . तसेच शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे नसता येत्या आठवड्यात कुठलीच कारवाई झाली नाही तर दिनांक 25 जून रोजी आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करू असेही निवेदनात म्हटले आहे,तसेच यादरम्यान जर काही बरेवाईट झाले तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे निवेदन उपविभागिय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर महेश पौरोहित,बबन शिंदे,नारायण लोखंडे,सुरेश तळेकर,विशाल गाढे,ञिंबक पाबळे,विकास जाधव,राहुल देशमुख,वामन जंजाळ,बाळासाहेब करतारे,राजु साबळे,नानासाहेब वानखेडे,विष्णु गाढे,आप्पासाहेब जाधव,दिनेश पडोळ,श्रीमंत राऊत,गजानन राऊत अदिसह शेतकरी तथा विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या या निवेदनावर साक्षर्या आहेत.
शेतकर्याला मारहाण करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करा नसता तिव्र अंदोलन छेडु सबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांना केलेली मारहाण अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून गाजावाजा करायचा आणि त्यांचाच बळी घेण्यासाठी पुढाकार घ्यायचा अश्या व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो.या राष्ट्रीयीकृत बँकांचे काही कर्मचारी नेहमीच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरतात. शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी नसता आम्ही तीव्र आंदोलन छेडु.
नारायण लोखंडे- सामाजिक कार्यकर्ते