घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शेतकरी अपघाती विमा योजनेसाठी वेळकाढूपणा


घनसावंगी तालुक्यातील अनेक प्रस्ताव धूळखात पडून

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

तालुक्यातील स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे अनेक प्रस्ताव धुळखात पडून असल्याने अनेक लाभार्थी या योजनेचा लाभापासून वंचित आहे.
विम्याचे प्रस्ताव लवकर मंजूर होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर उमटत आहे.सन २०१४ मध्ये राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी अपघात विमा सुरु केली असून अर्ज मंजुरीसाठी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.राज्यातील शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन विमा कंपनीकडे भरत असते. या योजनेअंतर्गत अपघाती म्रुत्यु,सर्पदंश,विजेचा धक्का, जंगली प्राण्यांचा हल्ला,पाण्यात बुडून म्रुत्यु,विहिरीत पडून म्रुत्यु,जंतूनाशके हाताळताना शेतकऱ्यांचा म्रुत्यु झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्या कुटुंबाला २ लाखांची मदत मिळते तर जखमी झाल्यास १ लाखांची मदत मिळते.अपघात झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत विम्यासाठी प्रस्ताव दाखल करावा लागतो.सर्व कागदपत्रांची पडताळणी करून प्रस्ताव योग्य असल्यास संबंधितांच्या खात्यावर २१ दिवसांच्या आत भरपाई देण्याची अट त्या विमा कंपनीला राज्य शासनाने घालून दिली आहे.परंतु वर्षभर हे प्रस्ताव मंजूर होत नाही.याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

“मागील एक महिन्यापूर्वी माझ्यावर शेतात रानडुकराने हल्ला केला होता.एक लाखांपेक्षा अधिक खर्च झाला असून.अजूनही उपचार सुरूच आहे.शासनाकडून मदत मिळेल अशी होती परंतु ‘सरकारी काम,आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे थांबण्याची वेळ माझ्यावर आली आहे.शासनाने लवकर मदत करावी.

अयोध्या पवार

गंभीर महिला विरेगाव तांडा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!