जाफराबाद तालुका

भाजप कार्यालयाची झडती घेणार्या जाफराबादच्या त्या पाच पोलिसांचे निलंबन अखेर रद्द

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

दैनिक पुढारीचे जाफराबाद येथील पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर हल्‍ला झाल्यानंतर दोन पोलिस उपनिरीक्षकांसह तीन पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयात आरोपींचा तपास केला होता. या प्रकरणी पाचही पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते.

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेउन पोलिसांवरील निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती.
त्यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, युवराज पोठरे, पोलीस जमादार मंगलसिंग सोळंके, सचीन तिडके, शाबान जलाल तडवी यांचे निलंबन मागे घेतले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!