भोकरदन तालुका

नवीन बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलास सुध्दा सावित्रीबाई फुले यांचेच नाव द्या.

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरातील नगर परिषदेच्या जागेवरील नगर परिषदच्या कार्यालयाशेजारी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह व मंगल कार्यालयाची इमारत होती.आता ती इमारत पाडण्यात आली असून,त्या जागेवर नगर परिषद व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. पुर्वी त्या जागेवर असलेल्या सांस्कृतिक सभागृहास व मंगल कार्यालयास विद्येची देवता ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले होते.नवीन बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलास सुध्दा सावित्रीबाई फुले यांचेच नाव पुर्ववत ठेवून व्यापारी संकुलाच्या दर्शनी भागात सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा.अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र दारूंटे तालुकाध्यक्ष विलास शिंदे शहराध्यक्ष नाजेम शहा,मा.जि.प.सदस्य साहेबराव झोरे,मा.नगरसेवक पंढरीनाथ खरात, नगरसेवक रमेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!