Breaking News
जालना जिल्हा

जालनातील कोरोना बाधीत त्या महिलेचा दुसऱ्यांदा घेतला स्वॅब.

जालनात एकूण ५२३ संशयित रुग्नाची तपासणी
जालना न्यूज :-
जालना जिल्ह्यात महिन्याभरात सुमारे ५२३ संशयित रूग्ण आढळून आले असून त्यातील फक्त, केवळ एका महिलेला कोरोनाची बाधीत असल्याचे चाचणीतून सिद्ध झाले. सदर्भित महिलेवर उपचार चालू असून मंगळवारी तिचे दुसऱ्यांदा स्वॅब घेण्यात आले आहे , ते स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातून देण्यात आली आहे.३४४ स्वॅब निगेटिव्ह आले असून, जवळपास २०० पेक्षा अधिक नागरिकाना घरी सोडले आहे. जिल्हयातील नागरिकांनी लॉक डाऊन पाळूनच कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित म्हणून जिल्ह्याात हजारो नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.असून, या सर्वांना किमान १४ दिवस घरात विलगीकरण खोलीत राहण्याच्या सक्त सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. जर हातावर सिक्का असलेला वक्ती बाहेर फिरत असेल तर पोलीस किंवा आरोग्य विभागाला याची माहिती कळविण्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे

सर्दी, ताप आणि खोक असल्याची लक्षणे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण खोलीत राहण्याचे निर्देश आहेत जिल्ह्यात अंदाजे जवळपास १८ हजार च्या आसपास रूग्णांना क्वारंटाईन करण्यात आले
आहे, यात राज्याबाहेर च्या नागरिकांचा ही समावेश आहे . परंतु काही जण हे शिक्का असतांनाही राजरोसपणे जालना शहरातील विविध कॉलनी तसेच ग्रामीण भागातही फिरत असल्याची माहिती मिळत आहे, अशावेळेस आरोग्य विभाग तसेच पोलिसांना कळवल्यास त्यांना तातडीने पकडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर करवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकानी सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉ.एम.के .राठोड,यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक